Saturday, October 6, 2012

इन्फ्लुएन्झा म्हणजे इन्फ्लुअन्स
एन. डी. आपटे

इटालियन ज्योतिषांनी इन्फ्लुएन्झा रोगाच्या पुन:पुन्हा उद्भवणाऱ्या साथींचे खापर आकाशस्थ ग्रहताऱ्यांच्या प्रभावावर म्हणजे influence वर फोडले. इटालियन भाषेत influence या अर्थाचा 'influenza' हा शब्द वापरतात.
मागच्या एका लेखात मेरलिन मन्रो या अभिनेत्रीचा ब्राँझचा पुतळा शिकागो शहरातून ७ मे २०१२ या दिवशी हलविण्यात आला हे वृत्त सांगितले. तो पुतळा सुटा करून कॅलिफोर्नियातील पाम स्प्रिन्ग्ज येथे नेण्यात आला. त्याच लेखात मी downbeat या शब्दाचा pessimistic, gloomy म्हणजे निराशाजनक, उदास करणारे हा अर्थ दिला होता. १६ जुलै २०१२ च्या ‘टाइम’ साप्ताहिकाच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा 'The Underachiever' या शीर्षकासह फोटो आहे. डॉ. मनमोहन सिंग यांनी करायला हवे होते त्यापेक्षा (खूपच) कमी साध्य केले असे ‘टाइम’ला म्हणायचे आहे. क्रिस्ता माहर (Krista Mahr) यांनी लिहिलेल्या या लेखात ते फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीचे सेक्रेटरी जनरल राजीवकुमार यांचे पुढील मत उद्धृत करतात, ''All new investment in the private sector has dried up'' म्हणजे ‘‘खासगी क्षेत्रातली नवी गुंतवणूक आटून गेली आहे.’’ (तशी परिस्थिती आहे) राजीवकुमार पुढे म्हणतात, I have never seen people as downbeat at they are today म्हणजे मी लोकांना आजच्या इतके निराश (= downbeat) पूर्वी कधीच पाहिलेले नाही. किती अचूक वापरला राजीवकुमार यांनी downbeat हा शब्द!
याच लेखात म्हटलंय ‘‘मेणबत्तीच्या उजेडात अभ्यास केलेल्या मनमोहन सिंग यांनी जगातील सर्वात मोठय़ा भारतरूपी लोकशाहीचा पंतप्रधान होण्यापर्यंत केलेली प्रगती ही निश्चित असाधारण आणि प्रेरणादायी आहे. कोणाला ही प्रगती प्रेरणादायक आहे? लेखक म्हणतो, ‘‘It is inspiring to a country where most people live a hardscrabble life in dirt-poor villages.’’ स्वैर अनुवादाने सांगायचे तर, मनमोहन सिंग यांची प्रगती अशा भारताला प्रेरणादायक आहे, की ज्या देशात बहुतांश लोक धुळीने भरलेल्या खेडय़ापाडय़ांत हलाखीचे (= hardscrabble) आयुष्य जगतात. Hardscrabble (हार्डस्क्रॅबल) हे विशेषण आहे आणि त्याचे दोन अर्थ पुढीलप्रमाणे आहेत. पहिला अर्थ ओसाड, नापीक (जमीन) असा आहे. अशा शेताला (barren) a hard scrabble farm आणि नापीक ओसाड जमिनीपासून तुटपुंजे उत्पन्न मिळविणाऱ्या शेतकऱ्याला a hard scrabble farmer असे म्हणतात.
दुसरा अर्थ, दारिद्रय़, हलाखी ज्याचे वैशिष्टय़, लक्षण आहे असे, असा आहे. गरिबीत घालवलेल्या बालपणाला a hard scrabble childhood असे म्हणतात. आमच्या खेडेगावात बहुतांश गरीब लोकांना हलाखीचे, हालअपेष्टांचे आयुष्य जगावे लागते. म्हणूनच ‘टाइम’मधील लेखाचा लेखक म्हणतो,They live a hard scrabble life in dirt-poor villages. हा शब्द हल्ली खूप वेळा वाचनात येतो, त्याची वाक्ये पुढील काही लेखांत मुद्दाम देईन.
Distraught हा असाच एक वारंवार वाचनात येणारा शब्द आहे. (उच्चार डिसट्रॉट, विशेषण) या विशेषणाचा deeply agitated (or extremely worried), anxious म्हणजे कमालीचा अस्वस्थ, चिंतातुर असा आहे. केंब्रिजच्या शब्दार्थकोशाने दिलेले पुढील वाक्य पाहा The missing child's distraught parents (हवालदिल झालेले आईवडील) made an emotional appeal for information on T.V. अर्थ स्पष्ट आहे.
मे २०१२ मध्ये ग्रीसमध्ये झालेल्या संसदेच्या निवडणुकीत सॅमरॅस यांच्या न्यू डेमोक्रॅटिक पार्टीला संसदेच्या एकूण ३०० (तीनशे) जागांपैकी १११ जागा मिळाल्या. व्हेनिझेलॉस यांच्या समाजवादी पार्टीला फक्त ४२ जागा मिळाल्या. ग्रीसच्या संसदेची अनेक पक्षांत विभागणी झाली आणि संयुक्त मंत्रिमंडळ बनवणेही फार अवघड (नाही, अशक्य) झाले. म्हणून ‘शिकागो ट्रिब्यून’ने आपल्या ७ मेच्या अंकात म्हटले, ''Samaras and Venizulos were distraught (= upset, extremely worried) over the poor performance of their respective parties.''
आता असाच वारंवार वाचनात येणारा शब्द grotesque (ग्रोटेस्क) हा आहे. या विशेषणाला जे अनेक अर्थ आहेत ते असे bizarre म्हणजे चमत्कारिक (विचित्र), तिटकारा आणण्याइतके विचित्र, absurdly incongruous म्हणजे हास्यास्पदरीत्या विसंगत, एकमेकांशी मेळ नसणारे, भीती वाटण्याइतके किंवा हसू येण्याइतके ओंगळ, नैसर्गिकपणापासून दूर जाणारे वगैरे. आपण unpleasant, विचित्र हे अर्थ लक्षात ठेवू. या शब्दाचा ध्वनीच (= उच्चार) नाक मुरडायला लावणारा आहे, नाही?
१५ एप्रिल २०१२ च्या ‘सण्डे टाइम्स’मधील एका लेखाचे शीर्षक होते (पान ११) South Asia's dynastic politics is grotesque म्हणजे दक्षिण आशियातील घराणेशाहीचे राजकारण तिटकारा, उबग आणणारे आहे. (= विचित्र = grotesque) दुसरे वाक्य On the stage there were tribal dancers wearing grotesque masks म्हणजे स्टेजवर विचित्र मुखवटे (= masks) घातलेले आदिवासी नर्तक होते.
आता एक गमतीदार माहिती देतो. मॉरिस हिलेमन या लशींच्या महान संशोधकाने त्याने लिहिलेल्या 'Vaccines' या पुस्तकात म्हटले आहे, ''Influenza got its name from Italian astrologers, who blamed the diseases periodic occurrence on the influence - in Italian influenza - Of the heavenly bodies''. स्वैर अनुवादाने : इटालियन ज्योतिषांनी इन्फ्लुएन्झा रोगाच्या पुन:पुन्हा उद्भवणाऱ्या साथींचे खापर आकाशस्थ ग्रहताऱ्यांच्या प्रभावावर म्हणजे influence वर फोडले. इटालियन भाषेत influence या अर्थाचा 'influenza' हा शब्द वापरतात. कळले ना की Influenza = Influence असे का ?
आता काही वाक्ये
१. Rahul's fans (= चाहते) crowded around him to ask for his autograph. राहुलची सही मागण्यासाठी, त्याच्या चाहत्यांनी त्याच्याभोवती गर्दी केली.
२. I was so tired I crashed out in an armchair. मी इतका दमलो होतो की, मी एका खुर्चीत झोपी गेलो. (to crash out म्हणजे दमल्यामुळे to go to sleep)
३. His attitude annoyed me and I blew up. म्हणजे त्याच्या वृत्तीचा मला राग आला आणि मी तडकलो. (= I blew up)
४.She sipped at her coffee. तिने हळूहळू- घुटक्याघुटक्याने कॉफी प्यायली.
५. It was a stretch for me sometimes to come up with the rent. भाडे देणे मला काही वेळा फार अवघड व्हायचे (Stretch = a difficult or demanding task)
६. Your guess is as good as mine. तुला जेवढे माहीत आहे तेवढेच मला माहिती आहे.
response.lokprabha@expressindia.com

Friday, October 5, 2012

 आज संध्याकाळी ऑफिस संपल्यावर गणेश बाबा मंदिरात गेलो. घरी साधारण सात वाजता परत आलो. रात्री म्यागी करून खाल्ली आत्ता  पाऊस पडत आहे.  गेल्या दोन ते तीन दिवसां पासून पाऊस पडत आहे.




 A Raja regime executed the first-come-first-served (FCFS) policy turned the priority list of applicants topsy-turvy. 

Top·sy-tur·vy

   [top-see-tur-vee]  Show IPA adverb,adjective, noun, plural top·sy-tur·vies.
adverb
1.
with the top where the bottom should be;upside down.
2.
in or into a reversed condition or order.
3.
in or into a state of confusion or disorder.
4.
turned upside down; inverted; reversed: atopsy-turvy reflection.
5.
confused or disorderly: a topsy-turvy classroom
Read blogs in the Times of India

Medical Dictionary
pisiform pi·si·form (pī'sə-fôrm')
adj.
Resembling a pea in size or shape. n.
Pisiform bone.
आज सकाळी ऑफिस मधे आलो . चालतांना पाठ दुखते. स्वयंपाक घराचा ओट्या मध्ये काही तरी प्रॉब्लेम आहे असे वाटते.

हि यामाची नवीन स्कूटर आहे. 

Thursday, October 4, 2012

THIS IS GAJANAN MAHARAJ MANDIR AT TRIMBEKSHWAR IN NASIK DISTRICT. I HAVE BEEN VISITING THIS TEMPLE FREQUENTLY. IT IS VERY CLEAN. THERE IS ALSO A HUGH DHARMASHALA WITH MODERN AMENITIES IN IT'S PREMISES.